इयत्ता - सहावी | विषय - गणित | ऑनलाईन टेस्ट क्र. २ |२. कोन |std 6th Maths online test | Kon/angles

       इयत्ता - सहावी

विषय - गणित

ऑनलाईन टेस्ट क्र. २

२. कोन
( Kon/ Angles)

 


 कोनांचे प्रकार व त्याबद्दल थोडक्यात माहिती खालीलप्रमाणे 

1) शून्य कोन - ज्या कोनाचे माप 0° असते त्या कोनाला शून्य कोन म्हणतात.

2) लघूकोन - ज्या कोनाचे माप 0° पेक्षा जास्त पण 90° पेक्षा कमी असते त्या कोनाला लघूकोन म्हणतात.
 


3) काटकोन - 90° च्या कोनाला काटकोन म्हणतात.



4) विशालकोन - ज्या कोनाचे माप 90° पेक्षा जास्त पण 180° पेक्षा कमी असते त्या कोनाला विशालकोन म्हणतात.


5) सरळकोन - 180° माप असलेल्या कोनाला सरळकोन म्हणतात.

6) प्रविशाल कोन - 180° पेक्षा मोठा व 360° पेक्षा लहान असलेल्या कोनाला प्रविशाल कोन म्हणतात.



7) पूर्ण कोन - पूर्ण कोणाचे माप 360° असते.


8) कोन मोजण्यासाठी कोनमापकाचा उपयोग करतात.


9) ज्या किरणामुळे कोनाचे दोन समान भाग पडतात त्याला कोन दुभाजक म्हणतात. 
खालील आकृतीत किरण BO हा कोन ABC चा कोन दुभाजक आहे.

10) कोन दुभाजक काढण्यासाठी कंस कोनाला ज्याठिकाणी छेदतो त्या बिंदूना छेदनबिंदू म्हणतात.
खालील आकृतीत बिंदू P व बिंदू Q हे छेदनबिंदू आहेत.

ऑनलाईन टेस्ट क्र.१ - भूमितीतील मूलभूत संबोध (टेस्ट सोडवण्यासाठी क्लिक करा.)

आपण ही टेस्ट सोडवून आपल्याला हा घटक कितपत समजला हे जाणून घेऊयात.


Thanks

Post a Comment (0)
Previous Post Next Post