पाचवी - शिष्यवृत्ती - मराठी - समूहदर्शक शब्द | 5th Scholarship - Samuhdarshak Shabda

       

पाचवी शिष्यवृत्ती

मराठी

समूहदर्शक शब्द

( Samuhdarshak Shabda )




कमी शब्दांचा वापर करून आपले म्हणणे मांडण्यासाठी समूहदर्शक शब्द वापरले जातात. मराठी भाषेमध्ये दैनंदिन व्यवहारात आपण या शब्दांचा वापर नेहमीच करत असतो

उपकरणांचा : संच

उंटांचा/ लमानांचा : तांडा

केसांचा : पुंजका, झुबका

करवंदाची : जाळी

केळ्यांचा : घड, लोंगर

काजूंची : गाथण

किल्ल्यांचा, चाव्यांचा : जुडगा

खेळाडूंचा : संघ

माशांची : गाथण

गाईगुरांचे : खिल्लार

गुरांचा : कळप

गवताचा : भारा

गवताची : पेंडी, गंजी

चोरांची, दरोडेखोरांची : टोळी

जहाजांचा : काफीला

ताऱ्यांचा : पुंजका

तारकांचा : पुंज

द्राक्षांचा : घड, घोस

दुर्वाची : जुडी

धान्याची : रास

नोटांचे : पुडके

नाण्यांची : चळत

नारळाचा : ढीग

पक्ष्यांचा : थवा

प्रशपत्रिकांचा, पुस्तकांचा : संच

पालेभाजीची : जुडी, गड्डी

वह्यांचा : गठ्ठा

पोत्यांची, नोटांची : थप्पी

पिकत घातलेल्या आंब्याची : अढी

फळांचा : घोस

फुलझाडांचा : ताडवा

फुलांचा : गुच्छ

बांबूचे : बेट

भाकरीची : चळड

मडक्यांची : उतरंड

महिलांचे : मंडळ

लाकडांची, उसाची : मोळी

वाघाचा : वृंद

विटांचा, कलिंगडाचा : ढीग

विद्यार्थ्यांचा : गट

माणसांचा : जमाव

मुलांचा : घोळका

मुग्यांची : रांग

मेंढ्याचा : कळप

विमानांचा : ताफा

आंब्याच्या झाडांची : आमराई /राई

वेलींचा : कुंज

साधूंचा : जथा

हरणांचा, हत्तींचा : कळप

सैनिकांची/चे : तुकडी, पलटण, पथक

ढगांचा : घनमंडल

फळांचा : घोस

मुलांचा, मुलींचा : घोळका

माणसांचा : घोळका

पोळ्यांची : चवड, चळत

घरांची : चाळ

केसांची : जट

चाव्यांचा : जुडगा

वानरांची : टोळी

वाळूचा : ढीग

फुल झाडांचा : ताटवा

वरील घटकाचा अभ्यास करून टेस्ट सोडवल्यास आपल्याला घटक कितपत आत्मसात झाला हे समजण्यास मदत होईल.

शिष्यवृत्ती परीक्षा टेस्ट सोडवताना हे प्रश्न आधी वहीत लिहून घ्या, कच्चे काम करा मगच ऑनलाईन सोडवा तरच आपला योग्य सराव होऊन परीक्षेत यश मिळेल.

विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला किती मार्क्स (गुण) मिळाले हे कमेंट करून नक्की सांगा.



Thanks

Post a Comment (0)
Previous Post Next Post