जिल्हानंतर्गत बदली २०२३ महत्वाचे पत्र

 जिल्हानंतर्गत बदली २०२३ सध्या बदल नाही

    जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या संगणकीय ऑनलाईन प्रक्रियेद्वारे जिल्हांतर्गत बदल्यांबाबतचे धोरण संदर्भाधीन दिनांक ७.४.२०२१ च्या शासन निर्णयान्वये विहित करण्यात आले आहे. सद्य:स्थितीत शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची कार्यवाही संदर्भ क्र. २ येथील दिनांक २०.१२.२०२२ च्या वेळापत्रकानुसार सुरु असून बदली प्रणालीमध्ये टप्पा क्र. १, २ व ३ मधील कार्यवाही पुर्ण झालेली आहे. सद्य:स्थितीत टप्पा क्र.४ मधील बदली अधिकारप्राप्त शिक्षकांची बदली प्रक्रिया सुरु आहे. संदर्भ क्र. १ येथील दिनांक ७.४.२०२१ च्या शासन निर्णयातील परिच्छेद क्र.४.४.५ नुसार बदली अधिकार पात्र शिक्षकांच्या बदल्या या बदलीपात्र शिक्षकांच्या जागेवर त्यांच्या विनंतीमधील प्राधान्यक्रमानुसार केल्या जात असल्यामुळे तसेच बदली प्रक्रियेमधील टप्पा क्र. २ व ३ मध्ये बदली पात्र शिक्षकांच्या जागांचे बहुतांश पर्याय वापरले गेल्यामुळे, बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना अर्ज सादर करताना पुरेसे पर्याय उपलब्ध होत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना बदली पत्र शिक्षकांच्या जागांसह उपलब्ध रिक्त जागा दाखविण्याबाबत शिक्षक आणि शिक्षक संघटनांकडून सातत्याने मागणी केली जात आहे.
     शिक्षकांची जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया संदर्भ क्र. १ येथील दिनांक ७.४.२०२१ च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार सुरु असल्यामुळे शिक्षक आणि शिक्षक संघटनांकडून प्राप्त होत असलेल्या मागणीच्या अनुषंगाने आता शासन निर्णयामध्ये किंवा बदली पोर्टलवर सुधारणा / बदल करणे उचित होणार नाही. तथापि, जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेमधील त्रुटींबाबत शिक्षक / शिक्षक संघटनांकडून वेळोवेळी प्राप्त झालेली निवेदने व मागण्यांच्या अनुषंगाने शासनाने स्थापन केलेल्या अभ्यासगटाकडून अभिप्राय मागविण्यात आले आहेत. त्याअनुषंगाने अभ्यासगटाकडून प्राप्त होणान्या शिफारशी विचारात घेऊन, त्यानुसार उचित निर्णय घेण्यात येईल. त्यानुसार शिक्षकांची सन २०२३ २४ या शैक्षणिक वर्षातील जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया राबविण्यात येईल, ही बाब संबंधित शिक्षक संघटनांच्या निदर्शनास आणण्यात यावी.


(प्रशांत पाटील) 

उपसचिव, 

महाराष्ट्र शासन.


Thanks

Post a Comment (0)
Previous Post Next Post