म्हणी इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती मराठी / Mhani std 5th Scholarship Marathi

 म्हणी


दीर्घकालीन अनुभवावर आधारलेले छोटे, मर्यादित, स्वरूपाचे अर्थपूर्ण वाक्य' म्हणजे म्हण होय. 
शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आपल्याला काही म्हणी व त्यांचे अर्थ पाठ असणे गरजेचे असते.
उदा.
  • अती तेथे माती - कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नुकसानकारकच ठरतो.
  • अंथरूण पसरून पाय पसरावे - ऐपतिच्या मानाने खर्च करावा.
  • इकडे आड तिकडे विहीर - दोन्ही बाजूंनी अडचणीत सापडणे. 
  • थेंबे थेंबे तळे साचे - थोडे थोडे साठवत राहिल्याने त्याचा मोठा साठा होतो.
  • विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर - गरजेपुरत्या गोष्टी घेऊन फिरणे.
  • शेंडी तुटो कि पारंबी तुटो- दृढनिश्चय करणे 
  • हातच्या काकणाला आरसा कशाला- प्रत्यक्ष दिसणाऱ्या गोष्टीला पुराव्याची गरज नसते.   
  • काखेत कळसा, गावाला वळसा - वस्तू जवळ असूनही सर्वत्र शोधत राहणे.   
  • भिंतीला कान असतात- गुप्त गोष्टी उघड झाल्याशिवाय राहत नाही.
  • दहा गेले,पाच उरले-  आयुष्य कमी उरणे 
अशा प्रकारे म्हणी अभ्यासा व खाली दिलेली चाचणी सोडवा.

2 Comments

Thanks

Post a Comment
Previous Post Next Post