काळ इयत्ता - पाचवी शिष्यवृत्ती मराठी /kal (tense) std-5th scholarship Marathi

 काळ 


वाक्यात दिलेल्या क्रियापादावरून जसा क्रियेचा बोध होतो,   तसेच ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचाही बोध होतो त्याला 'काळ' असे म्हणतात.

काळाचे मुख्य तीन प्रकार पडतात - 

  1. वर्तमानकाळ  
  1. भूतकाळ  
  1. भविष्यकाळ  
वर्तमानकाळ -
  क्रियापदाच्या रूपावरून   क्रिया आता घडते आहे  असे   जेव्हा  समजते   तेव्हा तो काळ 'वर्तमानकाळ' असतो.
उदा.
  •  मी अभ्यास करतो.
  • मी आंबा खातो. 
  • आम्ही क्रिकेट खेळतो.
  • ती गाणे गाते.
भूतकाळ -
जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडून गेलेली असते.  असा  बोध होतो तेव्हा त्या काळाला  'भूतकाळ' असे म्हणतात.
उदा.
  • गणेश शाळेत गेला.
  • तिने गृहपाठ केला.
  • मी निबंध लिहिला.
  • महाराज शौर्याने लढले.
भविष्यकाळ -
क्रियापदाच्या रूपावरून एखादी क्रिया हि पुढे घडणार आहे, याची जाणीव होते, तेव्हा त्या काळाला 'भविष्यकाळ' असे म्हणतात.
उदा.
  • पुढच्या आठवड्यात मी   औरंगाबादला जाईन.
  • आज पाऊस पडेल.
  • मी डॉक्टर बनेल.
  • ती नाचत जाईल.
'नाच' या क्रियापदाची   तीनही काळांतील एकवचनी व अनेकवचनी रूपे पहा.


सर्वनाम

वर्तमानकाळ

भूतकाळ

भविष्यकाळ

मी

नाचतो

नाचलो

नाचेल

आम्ही 

नाचतो

नाचलो

नाचू

तू

नाचतोस

नाचलास

नाचशील

तुम्ही

नाचता

नाचलात

नाचाल

तो (राम)

नाचतो

नाचला

नाचेल

ती  (सीता)

नाचते

नाचली

नाचेल

ते (एकवचन) (मूल)

नाचते

नाचले

नाचेल

ते ( अनेकवचन) (मुलगे)

नाचतात

नाचले

नाचतील

त्या (बाई)

नाचतात

नाचल्या

नाचतील

ती (अनेकवचन) (माणसे)

नाचतात

नाचली

नाचतील


वरील घटक अभ्यासल्यावर तो आपल्याला किती समजला आहे हे तपासून पाहण्यासाठी खाली दिलेली चाचणी सोडवा.

Thanks

Post a Comment (0)
Previous Post Next Post