सर्वनाम इयत्ता- पाचवी शिष्यवृत्ती मराठी / Sarvnam 5th Scholarship Marathi

 सर्वनाम


'नामऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात.' नामाची पुनरावृत्ती टाळणे हे सर्वनामाचे कार्य होय. सर्वनामांचा वापर सर्व प्रकारच्या नामासाठी होतो; म्हणून त्यांना सर्वनामे म्हणतात. सर्वनामाचा उपयोग नामऐवजी होत असल्याने सर्वनामाचे लिंगवचन त्या नामावरून ठरते.  

मी, आम्ही, तू, तुम्ही, तो, ती, ते, त्या, हा, ही, हे, ह्या, जो, जी, जे, ज्या, कोण, काय, आपण, स्वतः ही मराठीतील सर्वनामे आहेत.
उदा. १) ममता खूप अभ्यास करते.   
        २) ती हुशार आहे.  

वरील दुसऱ्या वाक्यातील 'ती' हा शब्द 'ममता' या नामाऐवजी वापरला आहे. अशा प्रकारे नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात.

सर्वनामाची काही उदाहरणे-

१) मी गावाला जाणार आहे.

२) आपण सहलीला जाऊ.

३) आम्ही तुला मदत करू.

४) तू बाजारात जा.

५) तुम्ही घरी या.

६) तो छान गातो.

७) ती हुशार आहे.

८) ते कालच गावाला गेले.

९) त्यांना घेऊन ये.

१०) कोण आले ? 

११) काय झाले ? 

चला तर विद्यार्थी मित्रांनो वरील घटक आपण अभ्यासला असेलच तर आता तो आपल्याला किती समजला हे खाली दिलेली टेस्ट सोडवून तपासूयात......

1 Comments

Thanks

Post a Comment
Previous Post Next Post