उतारा वाचन भाग - ६ (एरंडाचे गुऱ्हाळ -Castor cattle)

 ०६. एरंडाचे गुऱ्हाळ

            साचा रस काढण्याच्या ठिकाणाला गुऱ्हाळ म्हणतात. उसाचा रस काढण्यासाठी चरक या यंत्राचा वापर केला जातो. पूर्वी सर्रास लाकडी चरक वापरले जात. हल्ली लोखंडी चरक वापरले जातात. उसाचा रस आपल्याला उपयोगी असतो. उसाचा रस आवडीने प्यायला जातो. उसाच्या रसापासून काकवी, गूळ अशी उत्पादने घेतली जातात. एरंड ही वनस्पती कमी पावसाच्या भागात आढळते. एरंडाच्या खोडाचा उसाच्या खोडासारखा रस काढण्यासाठी वापर करता येत नाही. एरंडाचे झाड अन्नासाठी उपयोगी नसते. अशा एरंडाच्या गुऱ्हाळाचा काय उपयोग ? ज्या कामाचा उपयोग नसतो ते काम निरर्थक असते. एखादी व्यक्ती उगीचच काहीही, खूप वेळ बडबडत करत बसते, या बडबडीला काहीच अर्थ नसतो अशा बडबडीला ‘एरंडाचे गुऱ्हाळ’ असे म्हणतात. काही लोकांचे बोलणे एरंडाच्या गुऱ्हाळासारखे असते. अशी माणसे मग दुर्लक्ष करण्यायोग्य होतात.  


प्रश्न:
१. उसाचा रस काढण्याच्या ठिकाणाला काय म्हणतात?

२.एरंड ही वनस्पती कोणत्या भागात आढळते?

३.'एरंडाचे गुऱ्हाळ' असे आपण कशास म्हणतो?

06. Castor cattle

The place where sugarcane juice is extracted is called Gurhal. Charak is used to extract sugarcane juice. In the past, wooden wheels were widely used. Nowadays iron wheels are used. Sugarcane juice is useful to you. Sugarcane juice is a favorite drink. Products like molasses and jaggery are taken from sugarcane juice. Castor is a plant found in low rainfall areas. Castor husk cannot be used to extract juice like sugarcane husk. The castor tree is not useful for food. What is the use of such a castor herd? Work that is useless is useless. A person who spends a lot of time blabbering on like this, blabbering on like this, has no meaning. Some people talk like a castor beast. Such people then become negligible. Question: 1. What is the place for extracting sugarcane juice called? 2. Castor plant is found in which area? 3. What do we call 'castor herd'?

Thanks

Post a Comment (0)
Previous Post Next Post