उतारा वाचन भाग -१ (जंगलाचा राजा -King of the forest)

 ०१. जंगलचा राजा-सिंह




                 सिंहाला जंगलचा राजा म्हटले जाते. सिंह हा कळपाने राहणारा प्राणी आहे. सिंहाला इंग्रजीत ‘लॉयन’ व त्याच्या कळपाला ‘प्राईड’ म्हणतात. सिंहाच्या कळपात ३ ते ४ पर्यंत सिंह असू शकतात. शिकार केल्या नंतर कळपाचा म्होरक्या प्रथम शिकारीवर ताव मारतो व इतर नंतर. सिंहाची लांबी अडीच मीटर पर्यंत व वजन अडीचशे किलोग्रॅमपर्यंत असते. सिंहाच्या पिलाना छावा म्हणतात. जंगलात संध्याकाळच्या शांत वेळी सिंहाची गर्जना सुमारे आठ किलोमीटर दूर पर्यंत ऐकू जाते.सिंह झाडावर चढू शकतो. सिंह भूक लागेल तेंव्हाच शिकार करतात. इतर वेळी दिवसातील सुमारे वीस तास आराम करतात. सिंहाची दृष्टी माणसाच्या पाचपट तीक्ष्ण असते.सिंहाचे आयुष्य साधारणपणे बारा वर्षे असते. वन्य प्राणी सुरक्षित राहण्यासाठी शासनाने अभयारण्ये तयार केली आहेत.


प्रश्न:
१. जंगलाचा राजा कोणाला म्हटले जाते?
२. सिंहाचे आयुष्य साधारणपणे किती वर्षे असते?
३.सिंहाचे वजन साधारणपणे किती किलोग्रॅम असते?


01.  King of the forest

 The lion is called the king of the jungle. The lion is a herd animal.  The lion is called 'Lion' in English and its herd is called 'Pride'.  There can be 3 to 4 lions in a herd.  After hunting, the head of the herd first strikes the hunter and then the others.  Lions are up to two and a half meters in length and weigh up to two hundred and fifty kilograms.  The lion cub is called Chhava.  In the quiet of the forest in the evening, the roar of a lion can be heard about eight kilometers away. The lion can climb a tree.  Lions hunt only when they are hungry.  At other times they rest about twenty hours a day.  The sight of a lion is five times sharper than that of a man. The life span of a lion is about twelve years.  The government has set up sanctuaries to protect wildlife.

 Question:
 1.  Who is called the king of the jungle?
 2.  What is the average lifespan of a lion?
 3. What is the normal weight of a lion?

Thanks

Post a Comment (0)
Previous Post Next Post