सेतू अभ्यासक्रम

 *सेतू अभ्यासक्रम (ब्रीज कोर्स)*

दिनांक 1 जुलै 2021ते 14 ऑगस्ट 2021


 *सेतू अभ्यासक्रम (ब्रीज कोर्स)    काय आहे? त्याची अंमलबजावणी कशी करावी?*

 

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत सेतु अभ्यासक्रमाची निर्मिती केली गेली आहे.  

🟪  सेतू अभ्यास म्हणजे मागील वर्ग आणि पुढील वर्गाला जोडणारा सेतू अभ्यासक्रम. 

🟪 हा कोर्स 45 दिवसांचा आहे.

🟪 इयत्ता दुसरी ते दहावी पर्यंतच्या मराठी, गणित, इंग्रजी, विज्ञान, हिंदी, सामाजिक शास्त्र या विषयासाठी तयार केला आहे.       

  🟪सदर अभ्यासक्रम हा मागील इयत्ता च्या महत्त्वाच्या काही अध्ययन निष्पत्ती वर आधारित आहे .

🟪 यात दिवस निहाय कृतीपत्रिका देण्यात आल्या आहेत. 

🟪 विषय निहाय सर्व कृतीपत्रिका विद्यार्थ्यांना स्वतंत्र वहीमध्ये अथवा छपाई करून त्यामध्येही सोडवता येऊ  शकतात.

🟪  हा अभ्यासक्रम पालक, शिक्षक मित्र, सहाध्यायी, स्वयंसेवक, विद्यार्थी मित्र यांच्या मदतीने सोडण्यात यावा.

🟪 सदर अभ्यासक्रमात पंधरा ,पंधरा  दिवसाच्या फरकाने तीन चाचण्या देण्यात आल्या असून त्या विद्यार्थ्यांकडून ऑफलाइन अथवा ऑनलाईन पद्धतीने सोडवून घेऊन त्या तपासण्यात याव्यात. 

🟪 या चाचण्यांच्या गुणांची नोंद शिक्षकांनी स्वतःकडे ठेवणे आवश्यक आहे.

 *अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतरच त्या त्या  इयत्तेच्या अभ्यासक्रमाची अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुरू करण्यात यावी*.

1 Comments

Thanks

Post a Comment
Previous Post Next Post