सहज सुचलेला उपक्रम- ज्योती बेलवले

😺😈😽😼👽🐱🐸🐷🐵🌞🎅😊          

संभाषणासाठी मुखवटे तयार करणे

👇👇👇👇👇👇
आज वर्गात दुपार नंतर कोणता उपक्रम घ्यावा या विचारात असतानाच मुली माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या मॅडम आज आपण चित्र काढुयात

मला ही थोड़े हायसे झाले

कारण माझा प्रश्न खुद्द मुलांनीच सोडवला होता



मग काय
थोड़ा बदल करुन
ठरवले आज विविध मुखवटे तयार करायचे कारण या तयार केलेल्या मुखवट्यांचा वापर विवध संभाषणासाठी होणार होता

आणि झाले ही तसेच..

जुन्या पुठ्ठ्यावर मुखवट्याचे विविध आकार काढायला सांगितले . आकार काढताना तोच आकार पुन्हा येऊ नये आशी सुचना दिली.सर्वांचे आकार वेगळे हवेत. त्यासाठी विचार करायला सांगितले . कोणते आकार आवडतात? ते आकार कुठे पाहिलेत? यावर चर्चा घेतली.बर्याच जणांनी चाँकलेटवर मिळणारे कार्टूनचे मुखवटे तयार केले. त्यांना खडू...क्रेआँनने रंग दिले..आणि तयार झाले वेगवेगळ्या आकाराचे मुखवटे.


नंतर इंग्रजी तिल छोटी छोटी संभाषणे मुलांना दिली

आणि मुले ही ती अगदी सफाईदार पणे बोलू लागली

या कृतियुक्त सहभागामुळे कधीही संभाषणात सहभाग न घेणारी मुले सहभाग घेवून इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करत होती

बघा तुम्हाला आवडतात का..


                  जि.प.शाळा..केवणीदिवे .

😺😈😽😼👽🐱🐸🐷🐵🌞🎅😊

3 Comments

Thanks

Post a Comment
Previous Post Next Post