जगायच कस... D.K. पवार सर

🔴जगायचं कसं...रडत रडत की लढत लढत......💻📱

"आता तर कुठं गुणवत्ते संदर्भात खरे पाऊले उचलली आहेत...ते केवळ सहकारी शिक्षक बांधव,अधिकारी मंडळी व राज्यातील माझे उपक्रमशिल शिक्षक मंडळी यांच्या सहकार्याने.मी केवळ निमीत्त आहे.जि.प.प्रा.शा.गवळी पिंपरी चे आदर्श शिक्षक जाधव सर व त्यांचे गावकरी यांच्यातील सहकार्य हे सर्व गावांगावांत मिळाले पाहिजे.मी जेव्हा सोशल मिडीयाच्या माध्यमातून व प्रत्यक्ष भेटिने राज्यातील अनेक गुणवत्तापूर्ण शाळा पाहिल्या,तेव्हा असे निदर्शनास आले की,की आपन नौकरी न करता गावातील गोरगरीब मुलांसाठी स्वत:चे आयुष्य झिजवले पाहिजे.आमच्या भागातील सामाजीक परिस्थिती पाहता,असे लक्षात येते की,गावकरी आणखीही जि.प.शाळेतील मुलांकडे व शाळेकडे शासनाची शाळा म्हणून पाहतात.सर्व गोष्टी मोफत असतानाही समाजास त्याची किंमत न कळने ही बाब मनाला कुठंतरी खटकनारी आहे...
एका बाजूला आपल्या पाल्यांसाठी अतिजागरूक पालक वर्ग की जो मुलांच्या शिक्षणासाठी अतिशय दक्ष आहे.तर दुसर्या बाजूला केवळ शाळेत पाठवायचे म्हणून मुलाला शिकवनारा वर्ग..बर्याच ठिकाणची स्थानिक परिस्थिती वेगळीही असेल..
माञ आमची समस्या आहे ती जवळपास सर्वच पालकवर्ग मजूर ,ऊसतोड कामगार आहेत...दिवाळी नंतर २०-२५ मुले स्थलांतर करतात.परत ते वयानुसार थेट प्रवेश.मग सुरू होते आमची गुणवत्तेसाठी तारांबळ.काहि पालक वर्ग गृहपाठ व लेखन साहित्य पुरवत नाहित.आम्ही वारंवार पालकभेट व मेळाव्यातून पालकांना शिक्षणाचे महत्व समजावूनही सांगीतले.काही विद्यार्थी सहकारी शिक्षक श्री.संतोष डांगे,श्रीमती.अनिता डोंगरे व मी दत्तक घेऊन ते टिकवत आहोत...
व हे सर्व पालकवर्गास समजने अपेक्षित आहे.उनाड शालेय परिसर व वर्ग खोल्यात मुले रमत नव्हती.त्यामुळे उपस्थिती प्रमाण कमी असायचे.त्यासाठी प्रथम शाळा बोलकी केली ते ही शासनाचे अनुदान व काही प्रमाणात स्वत:चे पैसे खर्च करून.दिवस राञ स्वत: शाळेत थांबून रंगरंगोटिचे काम केले.केलेले वृक्षारोपन स्वत: कुपाटी लावून,घरच्या शेतातील पाईप वापरून वर्षभर पाणी दिले.
परिस्थिती बदलण्यासाठी रडत बसन्यापेक्षा लढत राहिलोत...
वेळप्रसंगी पाठिवर फवारा घेऊन झाडेही फवारली.ड्रेसकोड बदलून संपूर्ण टाय,सॉक्स,बुट,आयकार्ड मुलांना खुणवनार्या इंग्रजी शाळेप्रमाने केला...हे करत असताना सर्व गावकरी पाहत होते.प्रेरणा देत होते.शाळेस शासनातर्फे पुरवल्या जाणार्या सर्व सुविधा हे उन्हाळाभर बँनर लावून व पञके छापून सर्व शिक्षक मंडळी घरोघर फिरलोत...
प्रवेश उत्सवात सनई चौघडा,ढोल ताशा लावला...परिणाम सर्व गावकरी,अधिकारी या शैक्षणिक चळवळीत सहभागी झाले.आमच्या सर्व विचारांना जनाधार भेटला..
याचा परिणाम आज मुलांची दैनंदीन उपय्थिती प्रमाण शंभर टक्के आहे.शाळेत दाखल झाले व टिकले आहेत..
यापुढे केवळ न केवळ संपूर्ण व्यक्तीमत्व विकास व गुणवत्ता हे आमचे उद्दिष्ट आहे..
यासाठी राज्यातील मारूती राजगोळे,कोल्हापूर,कर्डेलीवाडीचे दासट दापंत्य असे कुत्येकांचे कार्य आमच्या समोर होते.तसेच माझ्या संपर्कातील राज्यातील सर्व मार्गदर्शक उपक्रमशिल शिक्षक व अधिकारी यांचे कार्य व विचार हीच आमची खरी प्रेरणा ठरली....
यापुढे केवळ न केवळ गुणवत्तावाढी साठी पालकांना शिक्षणाचे महत्व कळण्यासाठी कार्य करत व वर्गातील उपस्थिती टिकवावी लागेल.इंग्रजी माध्यमाच्या शाळेवर टिका न करता..त्यांच्याकडून काहि आदर्श आम्हांला शिकावे लागतील..आम्हांला बरेच अशैक्षणीक कामे,अभियान यांची कारणे न बनवता यांवरही मात करून वर्गातील गोरगरीबांच्या मुलांना न्याय देता आला पाहिजे.वर्गातील समोरच्या विद्यार्थ्यात आम्हीं स्वत:चा मुलगा बहितला पाहिजे..सर्व काही शासनच करेल किंवा सांगेल..याची अपेक्षा न करता...स्वत:च पुढाकार घेतला पाहिजे.नेहमीच चांगल्या बाबी आम्हीं इतरांकडून सतत शिकल्या पाहिजेत.
"विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत झालं पाहिजे".
तरच आमचा आत्मविश्वास वाढेल.....
तरच आम्हीं डॉ.एपीजे अब्दुल कलाम यामच्या स्वप्नातील विद्यानवादी पिढी घडवनार......
सर्व शिक्षक बांधवास आपल्या कार्यासाठी शुभेच्छा........!
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

"सत्कार्यासाठी सदैव पुढे......"
जि.प.प्रा.शा.वाणीसंगम....
डि.के.पवार.

1 Comments

Thanks

Post a Comment
Previous Post Next Post